जिल्ह्यात
छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण
कार्यक्रमास
सुरुवात
लातूर,दि.20:
भारत निवडणुक आयोग नवी दिल्ली यांच्याकडून दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता
दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष पुन:रिक्षक कार्यक्रम जाहीर करण्यात
आला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश नवीन मतदार नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित
मतदार याद्या तयार करणे हा आहे. सदर मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम दिनांक 16 सप्टेंबर
2016 ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राबविला जाणार आहे. मतदार याद्या पुन:रिक्षण प्रभाविपणे
राबविण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे
आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नमुना
-6 :- मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत
दिनाक 16 सप्टेंबर 2016 रोजी प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार
यादी प्रसिध्द झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादित आपले नाव आहे का नाही
? याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-6 म्हणजेच
मतदार नाव नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा
तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा. ज्या व्यक्तीचे दिनांक 1 जानेवारी
2017 रोजी वय 18 वर्ष पूर्ण होत आहे, परंतू मतदार यादित नाव नाही अशा व्यक्तीने आपले
नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेण्यासाठी फॉर्म नमुना -6 भरुन देणे.
नमुना -8 :- ज्या मतदाराच्या
मतदार यादितील तपशिलात (नाव,वय,लिंग, फोटो) इत्यादी मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त
करुन घेण्यासाठी फॉर्म नमुना -8 भरुन देणे.
नमुना-7 :- कुटुंबातील एखादी
व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नाव मतदार यादिमधून वगळण्यासाठी मृत्युच्या
दाखल्यासह फॉर्म नमुना-7 भरुन देणे. लातूर जिल्ह्यात मतदार यादीत ज्या मतदारांचे नाव
दुबार आहेत. अशा दुबार मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो. त्या
ठिकाणी मतदार यादीत नांव कायम ठेवून उर्वरीत ठिकाणची नावे वगळण्यासाठी फॉर्म नमुना-7
भरुन देणे.
बदली किंवा स्थलांतर :- मतदाराची
जर बदली किंवा इतर कारणामुले स्थलांतर झाले असल्यास, त्याने पुर्वीच्या ठिकाणाच्या
नावाची वगळणी करावी व नवीन रहिवासाच्या ठिकाणी नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणे.
छायाचित्रे बी.एल. ओ (BLO) कडे द्यावेत
:- लातूर जिल्ह्याच्या मतदार यादिमध्ये ज्या मतदारांचे फोटो नाहीत, अशा मतदारांनी
आपला पासपोर्ट साइज फोटो आपले संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे
जमा करावे.
युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी
:- 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांनी नाव नोंदणी वाढविणेसाठी ज्या युवकाचे वय
1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्ष पुर्ण झाले परंतु मतदार यादित नांव नाही अशा नवीन मतदारांनी
नांव नोंदणी करुन घ्यावी. लातूर जिल्ह्याच्या मतदार यादित स्त्री-पुरुष प्रमाण 907
इतके आहे. त्यामुळे महिला मतदारांनी नांव नोंदणी वाढविण्यासाठी ज्या महिलांचे वय दिनांक
1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्ष पुर्ण होत आहे. परंतु मतदार यादित नाव नाही अशा महिलांची
नावे मतदार यादित समाविष्ट करुन घ्यावीत.
राजकीय पक्ष
:- प्रत्येक राजकीय पक्षांनी मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय
सहायक (BLA) यांची नियुक्ती करावी. आणि त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य
करावे. ज्या मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आलेली आहे, त्यांचे नावे सर्व तहसिल
कार्यालयात उपलब्ध आहेत. सर्व राजकीय पक्षांनी
मतदार यादीमधून ज्या मतदारांची नावे विविध कारणांनी वगळण्यात आलेली आहेत त्याबाबत माहिती
घ्यावी. तसेच वगळलेल्या नावाबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 16 सप्टेंबर 2016 पासून
सुरु होणा-या संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत सदर आक्षेप लेखी स्वरुपात
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे नोंदवावित.
पुन:रिक्षण कार्यक्रमाचा तपशिल :-
प्रारुप
मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक 16 सप्टेंबर
2016 असून दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक 16 सप्टेंबर 2016 ते 14 ऑक्टोबर
2016 असेल. मतदार यादी मधील संबंधीत भागाचे/विभागाचे ग्रामसभा/स्थानिक संस्था येथे
वाचन आणि त्यांच्या सोबत बैठक इ. आणि नावांची खातरजमा कालावधी दिनांक 16 सप्टेंबर
2016 ते 30 सप्टेंबर 2016. विशेष मोहिम दिनांक दिनांक 18 सप्टेंबर 2016 व 30 सप्टेंबर
2016 असेल. दावे व हरकती निकालात काढणे या
करिता दिनांक 16 नोव्हेंबर 2016 पर्यंत असेल. डाटाबेसचे अद्ययावतीकरण (Upadation) इत्यादी
दिनांक 15 डिसेंबर 2016 पर्यंत असेल. अंतिम मतदार यादि प्रसिध्दी दिनाक 5 जानेवारी
2017 रोजी होणार आहे.
नागरिकांसाठी सुविधा :-
नागरीकांकडून
दावे व हरकती स्विकारण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय
(BLO) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या
मदतीसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात मतदार मदत केंद्र (Voters Help Centre) सुरु करण्यात
आलेले आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 2016 च्या ग्रामसभेत प्रारुप मतदार यादीचे वाचन करुन विशेष
संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सोईसाठी रविवार दिनांक
18 सप्टेंबर 2016 व 09 ऑक्टोबर 2016 या सुट्टीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर दावे
व हरकती स्विकारणेसाठी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांना भ्रमणध्वनीद्वारे
माहिती प्राप्त करुन घेणेसाठी प्रत्येक तहसिल कार्यलयात HELP LINE सुविधा उपलब्ध आहे. त्याचे क्रमांक पुढीलप्रमाणे
आहेत. लातूर(02382-242962),औसा (02383-222026), रेणापूर (02382-233394),उदगीर
(02385-255567), जळकोट (02385-275585),अहमदपूर (02381-262030),चाकूर
(02381-252161),निलंगा (02384-242024),शिरुर अनंतपाळ (02384-250225),देवणी
(02385-269444).
तरि लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी व 18 वर्ष
पुर्ण करणा-या प्रत्येक युवक/युवतींनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घेऊन मतदार यादी
ही पुर्णपणे दोषविरहीत व परिपुर्ण होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा
निवडणूक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
*****
Comments
Post a Comment