शिक्षणाचा मूळ गाभा राष्ट्रहीतच असलं पाहीजे
                                    कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
         लातूर,दि.5: शिक्षणाचा मूळ गाभा हा राष्ट्रहीतच असला पाहीजे व शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडून सामर्थशाली राष्ट्र निर्मिती मध्ये योगदान द्यावे असे आवाहन कामगार, भुकंप पुर्नवसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
             जिल्हा परिषदेमार्फत दयानंद सभागृहात आजच्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार टी. पी. कांबळे, वैजनाथ शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, श्रीमती वेणुताई गायकवाड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक वृंद शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           कामगार मंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, शिक्षक वर्गाने आपली भूमिका योग्य पध्दतीने समजून नितीमूल्य असलेला समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच शिक्षकांना खुले व्यासपीठ दिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळाही चांगला निकाल देऊन आजच्या शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहतील, असे त्यांनी सांगितले.
         जिल्हा परिषदेचे प्रश्न व शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याप्रमाणेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी अखंडपणे कार्यरत राहू असे त्यांनी सांगितले.
        लातूर जिल्ह्यात एक चांगले शैक्षणिक वातावरण असल्यामुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात लातूर जिल्ह्याचा एक वेगळा पॅटर्न निर्माण झालेला असून तो लौकिक कायम राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले. तसेच आदर्श पुरस्कारासांठी जिल्हा परिषदेच्या शेषनिधी मध्ये शासनाकडून मदत देणे व शिक्षकाच्या वेतनवाढीचा प्रश्न शासनस्तरावरुन सोडविण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगीतले.
         जिल्ह्यातील काही खाजगी शाळांमधील सुमारे 450 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आलेली असून जिल्हा परिषदेच्या शाळांचा गुणात्मक दर्जा वाढत असल्याचे अध्यक्ष श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी सांगीतले. शिक्षकांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले म्हणून प्रतिनिधीक स्वरुपात 20 शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.
         शिक्षक हा राष्ट्रहिताचा पाया मजबूत करणारा महत्वपुर्ण घटक असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दर्जेदार झाल्या पाहीजेत असे आमदार सुधाकर भालेराव यांनी म्हटले. तर जिल्हा परिषद शाळेतून ही गुणात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आमदार भिसे यांनी सांगितले.
        यावेळी दत्तात्रय बनसोडे, युवराज पाटील, रामचंद्र तिरुके यांनी ही मार्गदर्शनपर यथोचित भाषण केले. तर प्रास्ताविकात दिलीप नागराळकर यांनी शिक्षण विभागाचा लेखा जोखा मांडला.
           प्रारंभी सावित्रीबाई ज्योतीबा फुले व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व स्वागत गीत झाले.
       जिल्हा स्तरीय शिक्षक पुरस्कार सन-2016-17 बैठकीत निवड झालेल्या प्राथमिक/माध्यमिक/विशेष शिक्षकांची यादी-
प्राथमिक शिक्षक :- श्रीमती गवलवाड शशिकला गोविंदराव, श्री. वडे सत्यनारायण दशरथ, श्री. लोहारे संतोष शांतीर, श्री. ढेकरे प्रदिपकुमार सांगाप्पा, श्री. पलमटे नामदेव अनंतराव, श्री. मोमीन सलिम अब्दुल रहेमान, श्री. पांचाळ सुशिलकुमार मुरलीधरराव, श्री. जाधव रविंद्र रामराव, श्रीमती धनुरे कलावती गुंडप्पा.
माध्यमिक शिक्षक :- श्रीमती चव्हाण शोभा मरिबा (अपंग), श्री. बिरादार राम तुकाराम, श्रीमती साखरे विषुकांता सिताराम, श्री. शेख अब्दुल हमीद करिमसाब, श्री.रोडगे शिवानंद हावगीराव.
विशेष शिक्षक :- श्री. गुंडरे अजितचंद्र निवृत्तीराव, श्रीमती पवार के.आर., श्री. बिरादार शांतकुमार नागनाथ, श्रीमती कोळसूरे सुवर्णा माणिकराव, श्री. पाटील संतोष किशनराव.
         राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळविणा-या जिल्ह्यातील सन 2014-15 व सन 2015-16 मधील शिक्षकांचा सत्कार तसेच जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कामगार मंत्री श्री. निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
           कार्यक्रमाच सुत्रसंचालन विवेक सौताडीकर यानी केले तर आभार कृषि सभापती श्री. पाटील यांनी मानले.

                                                  *****




Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा