जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पोले
यांच्या हस्ते ध्वजारोहण
लातूर,दि.17: मराठवाडा
मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या
हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे,उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा
जाधव,जिल्हा नियोजन अधिकारी एस.बी.कोलगणे,जिल्हा उपनिवडणूक अधिकारी प्रताप काळे यांच्यासह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
बहुसंख्येने उपस्थित होते.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत परिसरात
ध्वजाराहेण
येथील शिवाजी चौक
परिसरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या
हस्ते सकाळी 8.20 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी श्री.विधाते,
समाज कल्याणचे शिवकांत चिर्कुते, वरिष्ठ भुवैज्ञानिक श्री.शेख, उपसंचालक सामाजिक वनीकरण सुर्वणा माने यांच्यासह महसूल व प्रशासकीय इमारतीमधील
विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment