महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची
वैद्यकीय महाविद्यालयास भेट व पाहणी
लातूर,
दि.03: महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन तेथील आरोग्य
सोयी सुविधांची पाहणी केली.
यावेळी श्री.राठोड
यांनी महाविद्यालयातील एम.आर.आय.युनीट ची पाहणी करून प्रतिदिन किती रुग्णांना एम.आर.आय.ची
सेवा दिली जाते याची माहिती महाद्यिालयाचे
डीन डॉ.शिंदे यांच्याकडून घेतली.व या आरोग्य सुविधेचा लाभ जास्तीत जास्त गरीब रुग्णांना
देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच महाविद्यालयातील
आय.सी.यु.कक्षाची पाहणी करुन हया कक्षात आवश्यक असलेल्या सर्व आरोग्य सुविधा अधिक चांगल्या
पध्दतीने रुग्णांना उपलब्ध करुन देण्याची सुचना श्री.राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालय
प्रशासनाला केली.
यावेळी खासदार
अरविंद सावंत,आमदार अजय चौधरी,आमदार प्रकाश अबाटीकर,जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, डॉ
शिंदे,अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर,उपविभागीय अधिकारी प्रताप काळे,तहसिलदार
संजय वारकड,श्री.संजय सावंत,श्री.नागेश माने,संतोष सोमवंशी यांच्यासह विविध अधिकारी
पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment