जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या
पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात

         लातूर,दि. 30: भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे दिनांक 5 सप्टेंबर 2016 व सहमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 19 सप्टेंबर 2016 रोजीच्या पत्रान्वये दिनांक 01 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम लातूर जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात येणार आहे. तरि जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षक मतदारांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे.
              पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे :- (1) मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक 01 ऑक्टोबर 2016  (2) मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटिसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी दिनांक 15 ऑक्टोबर 2016 (3) मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम  31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटिसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी दिनांक 25 ऑक्टोबर 2016. (4) नवीन मतदाराची दावे व हरकती फॉर्म न. 18 व 19 मध्ये स्विकारणे अंतिम दिनांक 05 नोव्हेंबर 2016 (5)  प्रारुप मतदार यादी छपाई करणे दिनांक 15 नोव्हेंबर 2016 (6) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करणे दिनांक 23 नोव्हेंबर 2016 (7)  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक 23 नोव्हेंबर 2016 ते 08 डिसेंबर 2016 (8) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई दिनांक 26 डिसेंबर 2016 (9) मतदार यांदीची अंतिम प्रसिध्दी करणे दिनांक 30 डिसेंबर 2016.
                उपरोक्त कार्यक्रमानुसार पात्र शिक्षक मतदारांची संपुर्णपणे नव्याने (De-novo) करण्यात येणार असल्याने यापुर्वीच्या सर्व मतदार याद्या विचारात घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदारास फॉर्म नमुना क्रमांक 19 व त्या सोबत संबंधीत पात्र शिक्षकांचा सेवा कालावधी बाबत परिशिष्ट-2 प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक राहील. सर्व शिक्षक मतदार यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व सबंधित पदनिर्देशित अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात फॉर्म स्विकृती केंद्र उघडण्यात आले असल्याने त्यांच्याकडे विहित वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सदर शिक्षक मतदारांची यादी आयोगामार्फत प्राप्त होणा-या Software मध्ये upload करुन प्रसिध्द करावयाची असल्याने प्रत्येक पात्र शिक्षक मतदाराने उपरोक्त फॉर्म सोबत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे बंधनकारक आहे, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात येत आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा