ना. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडून
प्रशासनास शेती पिकांचे पंचनामे
करण्याचे निर्देश
लातूर,दि.25: जिल्ह्यात माहे
जून ते सप्टेंबर 2016 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शासन
निर्णय कृषि व पदुम (पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय) विभाग दिनांक 05 जुलै 2016 मधील मार्गदर्शक सुचनानुसार
खरीप हंगाम 2016 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित
पिकांसाठी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी व्यवस्थापक, इफको
टोकीयो जनरल इन्सुरन्स कंपणी लि. व जिल्हा
प्रशासनास कौशल्य विकास व उद्योजकता कामगार,भुकंप
पुनर्वसन, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निर्देश
दिलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये साथरोगांचा
फैलाव होऊ नये याकरिता आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे निर्देश ही त्यांनी दिले आहेत.
****
Comments
Post a Comment