तावरजा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा
इशारा
लातूर,दि.25: जिल्ह्यातील
तावरजा मध्यम प्रकल्प धरणाची पातळी दिनांक 25 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.00 वाजता
612.20 मिटर असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 82.11 टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
अशीच पर्जन्यवृष्टी राहून येवा ( इनफ्लो) असाच राहिला तर येत्या 24 तासात धरण निर्धारीत
पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तावरजा नदी मार्गे
सोडण्यात येणार आहे. तरि तावरजा नदी काठावरील शेतकरी तसेच नदी काठावरील गावातील नागरिकांना
सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय
अधिकारी, लातूर पाटबंधारे विभाग-1, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे
****
Comments
Post a Comment