महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पेठ येथे वृक्षारोपण
नागझरी बॅरेजला भेट

     लातूर, दि.02: महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पेठ येथील जिल्हा परिषद शाळेच्या  प्रांगणात वृक्षारोपण करण्यात  येऊन  यावेळी  विविध शालेय प्रमाणपत्र व सातबाराचे ही वाटप  त्यांच्या हस्ते  झाले.
        यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, श्री. संजय सावंत, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड, श्री.नागेश माने, श्री.संतोष सोमवंशी  यांच्यासह इतर  पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
       महसूल विभागामार्फत पेठ येथील शेतक-यांच्या सातबारा वरील कर्जाचा बोजा कमी करण्यात आलेला आहे, अशा काही शेतक-यांना प्रातिनिधीक  स्वरुपात महसूल राज्यमंत्री राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये आण्णासाहेब पाटील व हंसराज साळूंके या दोन शेतक-यांच्या सातबाराचा 1 लाखाच्या कर्जाचा बोजा कमी केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
        महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत पेठ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालेय  प्रमाणपत्राचे वाटप श्री. राठोड यांच्या हस्ते झाले.
        यावेळी श्री. राठोड यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी इयत्ता पहिलीच्या  वर्गात जाऊन त्या विद्यार्थ्याशी चर्चा केली. तसेच विद्यार्थांनी त्यांच्या समोर आरोग्य विषयावर जनजागृतीपर लघुनाटकी सादर केली. त्याबाबत श्री. राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
         तसेच या प्रशाळेत कार्यरत असलेल्या बाल मंत्रीमंडळातील मंत्री व बाल मुख्यमंत्री यांनी श्री. राठोड यांना पुष्पगुच्छ देवून एक वेगळया प्रकारे स्वागत केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी  कविता सादर केल्या.
नागझरी बॅरेजला भेट :
           राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नागझरी बॅरेजला भेट देऊन येथील स्थानिक लोकांशी चर्चा केली. तसेच प्रशासनाकडून नागझरी बंधा-यातील पाण्याची सद्यस्थिती, एकूण साठवण क्षमता आदीची माहिती घेवून मार्गदर्शक सुचना दिल्या.
उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक :
         महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 03 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम अनुषंगाने टंचाईच्या उपाययोजना, टंचाईच्या परिस्थतीती मध्ये शासनाने दिलेल्या सवलतीची माहिती  तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, पीक परिस्थिती आदि बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे.


*****




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु