जिल्ह्यातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा

       लातूर,दि.15: सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नदी, नाले, ओढे इ. मधून पाणी वाहत असताना शेतक-यांनी, शालेय व लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे प्रशासनाने सुचित केले आहे.
           मांजरा नदीपात्रातून तगरखेडा बॅरेज मध्ये पाण्याचा येवा सुरु असल्याने तगरखेडा बॅरेज तुडंब भरले असून गेट उघडून पाणी सोडण्याची कार्यवाही निम्न तेरणा कालवा विभाग क्रमांक 2 यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच मसलगा तालुका निलंगा येथील मसलगा प्रकल्पातूनही दिनांक 15 सप्टेंबर 2016 पासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. अजून दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. तरि जिल्ह्यातील सर्व नदीकाठ परिसरातील सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा