जिल्हयातील नागरिकांनी पासपोर्ट कॅम्पच्या सुविधेचा
लाभ घ्यावा
- खासदार सुनिल गायकवाड
लातूर
दि.17: जिल्हयातील नागरिकांना पासपोर्टसाठी नागपुर येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात जावे लागत
होते. परंतू जिल्हाधिकारी कार्यालयात 17 व 18 सप्टेंबर 2016 या कालावधीत पासपोर्ट
कॅम्प आयोजित करण्यात आला असून या सुविधेचा
जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन खासदार सुनिल गायकवाड यांनी पासपोर्ट
कॅम्पच्या उदघाटनप्रसंगी केले.
यावेळी जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले, निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे, उपमहापौर चाँदपाशा घावटी, क्षेत्रीय पारपत्र अधिकारी सी.
एम. गौतम, अतिरिक्त क्षेत्रीय पारपत्र अधिकारी आर. शिवकुमार, सहाय्यक पारपत्र अधिकारी समीर दाफडे
यांच्यासह नागपूर पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
खासदार गायकवाड
पुढे म्हणाले की, नागपूर येथील पासपोर्ट कार्यालयात जाऊन पासपोर्ट काढणे लातूरकरांना गैरसोयीचे होते.त्यामुळे
याबाबत लोकसभेत प्रश्न मांडून लातूरकरांना स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय दयावे अथवा लातूर
येथे पासपोर्ट शिबीराचे आयोजन करून येथील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आपण केली होती, असे त्यांनी सांगितले.
तसेच जिल्हाधिकारी
कार्यालयातील या दोन दिवशीय पासपोर्ट शिबीरामध्ये कागदपत्राची पुर्तता करणाऱ्या सर्व
नागरिकांना पासपोर्ट मिळणार असल्याने सर्वांनी शांतता ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन
खासदार गायकवाड यांनी केले.
या शिबीराच्या
माध्यामातून नागपुर येथील पासपोर्ट कार्यालय येथेच आले असल्याने नागरिकांची सोय होऊन
वेळेत पासपोर्ट मिळणार आहे.तसेच पासपोर्टची मागणी करणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यास
वेळोवेळी याप्रकारची शिबीरे आयोजित करण्यात येतील असे श्री.गायकवाड यांनी स्पष्ट केले.त्याप्रमाणेच
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून लातूर जिल्हा पासपोर्टकरिता सोलापूर
जिल्हयास जोडण्याची कार्यवाही सुरू असल्याने भविष्यात लातूरकरांना पासपोर्ट साठी नागपुरला
जाण्याची गरज भासणार नसल्याचे श्री.गायकवाड यांनी सांगितले.
प्रारंभी खासदार
सुनिल गायकवाड व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून पासपोर्ट कॅम्पचे
उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन
तहसिलदार कुलकर्णी यांनी केले तर गोविंद माने यांनी आभार मानले.
*****
Comments
Post a Comment