सर्व मागासवर्गीयांचे लोकांचे कबाले त्वरीत द्यावेत
महसूल राज्यमंत्री संजय राठोड
लातूर,
दि.03: लातूर शहरातील खाडगाव गायरान अंतर्गत येणा-या गायत्री नगर भागातील सर्व मागासवर्गीय
लोकांची अतिक्रमणे नियमीत करुन त्याबाबतचे
कबाले त्वरीत देण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले.
गायत्री
नगर येथील हनुमान मंदीराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. राठोड बोलत होते. यावेळी
खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी, आमदार प्रकाश अबाटीकर, जिल्हाधिकारी पांडुरंग
पोले, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड यांच्यासह अधिकारी पदाधिकारी
व या भागातील नागरिक उपस्थित होते.
श्री.राठोड
पुढे म्हणाले की लातूर शहरातील सर्वे नंबर 72 अंतर्गत 6 हेक्टर 24 आर क्षेत्रावर नागरिकांनी
केलेल्या अतिक्रमाणातील शासन निर्णयानुसार सर्व मागासवर्गीय लोकांचे अतिक्रमाणे नियमित करून
त्यांना प्रशासनाने कबाले त्वरीत दयावेत तसेच उर्वरित लोकांच्या अतिक्रमणाबातचा अहवाल
पाठवावा व त्यावरील निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल.असे त्यांनी सांगितले.
शासन निर्णयानुसार
या गायरान जमीनवर अतिक्रमणे केलेल्या पैकी मागसवर्गीय लोकांची अतिक्रमणे नियमित करून
त्यावेळेच्या बाजार भावाने अडीचपट इतर समाजाच्या लोकाकडून पैसे घेऊन अतिक्रमणे नियमित
करण्याचे निर्देश असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांनी सांगितले. परंतू सदर
बाजारभाव अधिक असल्याचे सांगुन नागरिक प्रतिसाद देत नसल्याची माहिती श्री.काळे यांनी
दिली.
*****
Comments
Post a Comment