मांजरा नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा

       लातूर,दि.25:लातूर शहराला पाणीपुरवठा करणा-या  धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणी पातळी दिनांक 25 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 6.00 वाजता 640.40 मिटर इतकी असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 58.77 टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून येवा याप्रमाणेच येत राहिला तर येत्या 24 तासात मांजरा धरण निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा मांजरा नदीमार्गे सोडावा लागणार आहे, तरि मांजरा नदीकाठांवरील शेतकरी व नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. तरि याबाबत नदीकाठावरील गावांमधील सर्व नागरिकांनी व शेतक-यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी, लातूर पाटबंधारे विभाग-1, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु