*लातूर जिल्ह्यातील युपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा , 22 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी करणार गौरव*

 

 

*लातूर जिल्ह्यातील युपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा ,

22 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी करणार गौरव*

 लातूर दि.20(जिमाका):- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील युवक, युवती यांनी उज्वल यश संपादन केले. हा लातूर जिल्ह्याचा गौरव आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. हे या सर्वांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30  वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करणार आहेत.

जिल्ह्यातील युवक, युवतींना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून या सर्वांचे फुसबुक लाईव्ह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आणि जिल्हा माहिती कार्यालय, लातूर https://www.facebook.com/DIOlatur-ज़िल्हा-माहिती-कार्यालय-लातूर-105857208522968/  https://www.facebook.com/LaturDM/  या पेजवरून करण्यात येणार आहे. अधिकाधिक युवक, युवतींनी हा लाईव्ह कार्यक्रम बघावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.  

                                                        ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित