जी.डी.सी.अँन्ड ए परीक्षा 23 ते 25 ऑक्टोबर रोजी - प्रवेश पत्र न मिळाल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा

 

जी.डी.सी.अँन्ड ए परीक्षा

23 ते 25 ऑक्टोबर रोजी

 

*प्रवेश पत्र न मिळाल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा

 

            लातूर दि.20(जिमाका):- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 23,24 व 25 ऑक्टोबर 2021 रोजी  10.00 ते 1.00 व दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत जी.डी.सी.अँन्ड ए परिक्षा श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, शासकीय रुग्णालयासमोर, सिग्नल कँम्प लातूर या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी सर्व परिक्षार्थीनी ज्यांना परिक्षेचे हॉल तिकीट मिळालेले नाहीत अथवा मोबाईलव्दारे संदेश प्राप्त झालेले नाहीत त्यांनी पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व अनुषंगिक ओळखपत्रासहित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर, प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे संपर्क साधावा असे आवाहन चिफ कंडक्टर जी.डी.सी. अँन्ड ए. परिक्षा तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक :- (02382-245193) या कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

                                               ****

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास