लातूर जिल्ह्यातील युपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा , शुक्रवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते गौरव

 

लातूर जिल्ह्यातील युपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा ,

शुक्रवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते गौरव

 

 लातूर दि.21(जिमाका):- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील युवक, युवती यांनी उज्वल यश संपादन केले. हा लातूर जिल्ह्याचा गौरव आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. हे या सर्वांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30  वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करणार आहेत.

जिल्ह्यातील युवक, युवतींना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून या सर्वांचे फेसबुक लाईव्ह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आणि जिल्हा माहिती कार्यालय, लातूर https://www.facebook.com/DIOlatur-ज़िल्हा-माहिती-कार्यालय-लातूर-105857208522968/  https://www.facebook.com/LaturDM/  या पेजवरून करण्यात येणार आहे. अधिकाधिक युवक, युवतींनी हा लाईव्ह कार्यक्रम बघावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.  

                                                        ****

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास