शिरूर अनंतपाळक, चाकूर तालुक्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन होणार सघन कुक्कुट विकास गट

 

·        अनुसूचित जाती महिला लाभार्थ्याच्या निवडीसाठी अर्ज मागविले

लातूर, दि. 25 (जिमाका) : सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यात शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अनुसूचित जातीच्या एका लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत औसा संबंधित पंचायत सामितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन. एस. कदम यांनी केले आहे.

या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये असून लाभार्थ्याला शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 देय राहील.  उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज घेवून उभा करावी लागेल, असे डॉ. कदम यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास