लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे कारगिल विजय दिवस साजरा

 

लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे कारगिल विजय दिवस साजरा

लातूर, दि. 26 (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद युद्ध स्मारक परिसरात 24 व्या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांच्यासह भारतीय माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी, माजी सैनिकमाजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी, वीरमाता विरपिता यांची उपस्थिती होती. कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या वारसांचा शहीद जवान सुर्यंवशी प्रमोद नारायणराव यांच्या कुटुंबियांचा ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.




Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास