तांदूळजा पशुवैद्यकीय दवाखान्यात कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक यांची नेमणूक

 

तांदूळजा पशुवैद्यकीय दवाखान्यात

कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक यांची नेमणूक

            लातूर, दि. 19 (जिमाका): तांदूळजा (ता. लातूर) येथील श्रेणी -1 पशुवैद्यकीय दवाखान्यातील कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक यांनी 10 जुलै 2023 रोजी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदावर 17 जुलै 2023 रोजी कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे दवाखान्यात यापुढे पूर्णवेळ सुविधा पुरविल्या जातील, अशी लातूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांनी दिली आहे.

                तांदूळजा (ता. लातूर) येथील श्रेणी -1 पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. जे. पाटील रजेवर असल्यामुळे तेथील अतिरिक्त कार्यभार गातेगाव श्रेणी-1 पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आठवड्यातील दोन दिवस व इतर अत्यावश्यक सेवा तांदूळजा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पुरविण्यात येतात, अशी माहिती लातूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांनी दिली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास