औसा तालुक्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन होणार सघन कुक्कुट विकास गट

 

औसा तालुक्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी

तत्वावर स्थापन होणार सघन कुक्कुट विकास गट

अनुसूचित जाती महिला लाभार्थ्याच्या निवडीसाठी अर्ज मागविले

लातूर, दि.25 (जिमाका) : सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अनुसूचित जातीच्या एका लाभार्थीची  निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत औसा पंचायत सामितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन. एस. कदम यांनी केले आहे.

या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये असून लाभार्थ्याला शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 देय राहील.  उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज घेवून उभा करावी लागेल, असे डॉ. कदम यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित