कौशल्य मागणी सर्व्हेक्षणा” मध्ये अधिकाधिक रोजगार इच्छुक युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

 

कौशल्य मागणी  सर्व्हेक्षणामध्ये अधिकाधिक रोजगार इच्छुक



युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

            लातूरदि.10(जिमाका) कौशल्याची मागणी  सर्व्हेक्षण आणि उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोदणी माहिमेमध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त युवक - युवतींनी व उद्योजकांनी सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्यातील युवक-युवतींनी आणि उद्योजकांनी जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करून सदर मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन लातूर केंद्राचे सहायक आयुक्त्‍ बालाजी मरे  यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. या महत्वकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. याकरिता राज्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षण दरम्यान स्वारस्यामध्ये वृध्दी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षणातील यशस्वी उमेदवारांना रोजगार व स्वंयरोजगारांच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील.

            त्यानुषंगाने राज्यातील युवक-युवतींना मागणीवर आधारित (Demand Driven)  कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासठी कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण मोहिमेचे दि. 1 जुलै ते 31 जुलै, 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून त्या गुगल फॉर्मची लिंक: https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 असी आहे. सदर लिंकला भेट देवून जिल्ह्यातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त  प्रमाणात आपली नोंदणी करावी.

            तसेच जिल्ह्यातील उत्पादन व सेवा क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मोठया उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉबरोल निहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल. त्यामुळे प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणमध्ये वृध्दी होईल. त्यासाठी उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी  https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9  या गुगल लिंकला भेट देऊन आपल्या उद्योगातील कौशल्याची मागणी कळवावी.

वरिलप्रमाणे उमेदवारांसाठी कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण व उद्योजकांसाठी उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदण अशा दोन वेगवेगळ्या गुगल लिंक देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोणत्याही तांत्रीक अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सोबत उमेदवारांसाठी  कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण व उद्योजकांसाठी  उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी अशा दोन वेगवेळया QR Code देण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित