साहित्यरत्नलोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्याथेट कर्ज योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित

 साहित्यरत्नलोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्याथेट कर्ज

योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित  


लातूर दि. 13:  साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकासमहामंडळामार्फत सन 2024-25 करिता थेट कर्ज योजनेसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.मातंग समाज व 12 पोटजातीतील इच्छूक अर्जदारांनी 17 फेब्रुवारी ते 5 मार्च, 2025 याकालावधीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेतून 1 लाख रुपयेपर्यंतकर्ज मर्यादा असून जिल्ह्याला 60 प्रकरणांचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यातील मांग, मातंग व तत्सम 12 समाजातीलवय 18 ते 50 वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत.  शहरी व ग्रामीण भागातील अर्जदारांच्या कुंटुंबाचेवार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्याकुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राचीपूर्तता करुन या योजनेत समाविष्ट लघु व्यवसाय जसे : शेळीपालन, म्हैसपालन, दुग्धव्यवसाय,कुक्कुटपालन, पंम्चर दुकान, वाशिंग सेंटर, फळभाजी विक्री, हॉटेल व्यवसाय,फीरते साडीसेंटर, झाडू टोपले बनविणे, शिलाई मशिन, टेलरींग, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापडउद्योग, फीरते कापड व्यवसाय, बेकरी, द्रोण पत्रवाळी, बांगडी व्यवसाय, गिफ्ट सेंटर,इत्यादी व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसहउपस्थित राहून दाखल करावेत.त्रयस्थ मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही.

आवश्यककागदपत्रेजातीचा दाखला झेरॉक्स प्रत, जातीचा दाखला(महिला करिता दोन्ही नावाचे एकच असल्याचे नोटरी सह शपथपत्र देणे), उत्पन्नाचा दाखलाझेरॉक्स प्रत, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, पॅन कार्ड झेरॉक्सप्रत, दोन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), जागेचा पुरावा (नमुना 8 अ,लाईट बिल,कर पावती, सातबारा), व्यवसायचे घेतलेले प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभवप्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला (टी.सी), यापूर्वी कोणत्याही शासकीय योजने अंतर्गतव महामंडळाकडून लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र.


कर्ज प्रकरणाच्या सर्व कागदपत्राच्याझेरॉक्स प्रतिवर लाभार्थीने स्वत: स्वाक्षरीने सांक्षाकित करुन द्याव्यात.

कर्ज मागणी अर्ज साहित्यरत्न लोकशाहिरअण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, लातूर येथे 5 मार्च 2025 पर्यंतकार्यालयात दाखल करावेत. अर्जाचा नमुना या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.

5 मार्च, 2025 नंतर प्राप्त अर्ज स्विकारलेजाणार नाही, असे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे (मर्या) जिल्हाव्यवस्थापक यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला शिवनेरी गेट, 1 समोर डाल्डा फॅक्टरी कपाऊंड, लातूरयेथील कार्यालयात संपर्क साधावा.

थेट कर्ज योजनेअंतर्गत कार्यालयाकडे यापूर्वीदाखल केलेले रुपये 1 लाखांचे थेट कर्जाचे अर्ज रद्द समजण्यात यावे. उद्दिष्ट पेक्षाजास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णयानुसार महामंडळे 14 मे 2012 नुसार  लाभार्थीचे कर्ज प्रकरण लॉटरी  पध्दतीने निवड केली जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित