डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत नव्याने विहीत नमुन्यातील सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत

नव्याने विहीत नमुन्यातील सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

लातूर दि. 17: अल्‍पसंख्‍याक विकास विभागाच्‍या शासन निर्णय ७ ऑक्टोबर, २०१५ अन्‍वये डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्‍यात येत आहे.

योजनेसाठी यापूर्वी पाठविण्यात आलेले प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे  संस्‍थाचालकांनी या योजनेअंर्तगत सुधारित प्रस्ताव 13 फेब्रुवारी, 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार इन्वर्टर सुविधा उपलब्ध करून देणे व पेयजलाची व्यवस्था या दोन पायाभूत सोयी सुविधा तसेच राज्‍यातील डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्राथम्याने सादर करावेत.

तसेच 11 ऑक्टोबर, 2013, 22 डिसेंबर, 2023 रोजीचे शासन निर्णय व 21 ऑगस्ट, 2024 रोजीचे शासन शुद्धीपत्रक मधील तरतुदीनुसारे अनुदानाचे नव्याने विहीत नमुन्यात, परिपूर्ण सुधारित प्रस्ताव जिल्‍हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्‍हाधिकारी कार्यालय,बार्शी रोड, लातूर या कार्यालयात 22 फेब्रुवारी, 2025 रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्‍त प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित