लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

 लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारामध्ये

प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

 

लातूर, दि.10:-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित तारखेला सकाळी 10 ते सांयकाळी 2 वाजेपर्यंत प्रवासी राजा दिन आणि दुपारी 3 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत कामगार पालक दिन साजरा होणार आहे.

लातूर येथे 24 फेब्रुवारी 2025 रोजी, उदगीर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 , अहमदपूर येथे                3 मार्च 2025, निलंगा येथे 7 मार्च 2025, औसा येथे 10 मार्च 2025 रोजी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक हे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाला उपस्थित राहतील.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत