हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची नोंद; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची नोंद; नागरिकांनी अफवांवर
विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन
लातूर, दि. 3 :दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7.46 व 09.43 वाजता हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे तालुका वसमत येथे भूकंपाची अनुक्रमे 3.3 आणि 4.5 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील काही भागात सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मौजे पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे होता. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांनी भूकंपाचे धक्के बसत असताना पटकन मोकळ्या जागेत जावे, विशेषत कच्चे बांधकाम, (दगड मातीचे बांधकाम) असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीची व सूचनांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7.46 व 09.43 वाजता हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे तालुका वसमत येथे भूकंपाची अनुक्रमे 3.3 आणि 4.5 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील काही भागात सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मौजे पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे होता. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांनी भूकंपाचे धक्के बसत असताना पटकन मोकळ्या जागेत जावे, विशेषत कच्चे बांधकाम, (दगड मातीचे बांधकाम) असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीची व सूचनांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment