Posts

Showing posts from August, 2016
Image
सर्व नागरिकांनी महा-अवयव दान अभियानात सहभागी व्हावे                                  जिल्हाधिकारी पांडुरंग पोले       लातूर,दि.30: राज्य शासन दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत राज्यात सर्वत्र महा-अवयवदान अभियान राबवित आहे. सर्व नागरिकांमध्ये अवयव दानाविषयी जनजागृती करुन इतर गरजू लोकांना  आपल्या अवयव दानामूळे नवजीवन मिळू  शकते याची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे तरी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महाअवयव दान अभियानात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे.          यावेळी खासदार सुनील गायकवाड ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए.डी. शिंदे, उप अधिष्ठाता  डॉ. गिरीष ठाकूर, डॉ. मंगला शिंदे, प्राध्यापक डॉ. एस.जी. देशपांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक कोकणे जिल्हा शल्य चिकीत्सक  श्री. डॉ. दुधाळ तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थींनी, अधिकारी कर्मचारी, परिचर्या, एम. आय. टी कॉलेजमधील विद्यार्थी तसेच प्राध्यापक वृदांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.           जिल्
विशेष वृत्त                                                                       प्रादेशिक योजना : लातूर जिल्हा ग्रामीण व नागरी भागांचे अवलंबित्व विचारात घेता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी   महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे तरतुदीनुसार दिनांक 13 ऑगस्ट 2007 च्या अधिसूचने नुसार संपूर्ण लातूर जिल्हा हा '' प्रदेश '' म्हणून घौषित केला असून त्याचे सुनियंत्रित व समतोल विकासासाठी प्रादेशिक योजना तयार करण्याकरीता 15 फेब्रुवारी 2011 चे आदेशानुसार मा.आयुक्त , औरंगाबाद विभाग , औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली एकूण 21 सदस्य असलेल्या लातूर प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना केलेली आहे.             भविष्य काळामध्ये होणारा विकास सुनियाजित / सुनियंत्रित करण्यासाठी  जिल्हयाचा विकास आराखडा तयार करणे हा एक प्रभावी पर्याय आहे. जिल्हा हा नियोजनासाठी घटक धरण्याचे शासनाने यापूर्वीच ठरवून सांगली , जळगांव , रत्नागिरी , पुणे , चंद्रपूर-बल्लारपूर , सोलापूर , नाशिक , अकोला , औरंगाबाद , इत्यादी जिल्ह्यासाठी योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे
Image
गणेश मंडळांनी लोकमान्य महोत्सव व गणेशोत्सव अभियानात सहभागी व्हावे                                                           -जिल्हाधिकारी पांडूरंग पोले गणेश मंडळांनी 29 ऑगस्ट पर्यंत तालुका गट शिक्षणाधिकाऱ्याकडे अर्ज करावेत       लातूर,दि.22: राज्याच्या पर्यटन व सांस्कृतीक विभागामार्फत लोकमान्य महोत्सव व लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान-2016 या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. तरि या जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी या अभियानात सहभागी व्हावे, तसेच दिनांक 29 ऑगस्ट 2016 पर्यंत तालुका गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.          जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान-2016 च्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले बोलत होते. यावेळी अभियान समिती सदस्य बसवराज मंगरुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. गुरसळ, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य.) गणपत मोरे, याच्यासह जिल्ह्यातील गणेश म
Image
कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हरंगुळ (बु.) येथे जलपुजन लातूर दि.15:- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून हरंगुळ (बु) येथील नदीपात्राचे खेालीकरण व रूंदीकरणाचे 15 किलो मीटरचे काम करण्यात आलेले आहे. यावर्षीच्या पावसामूळे  सदरील नाल्यात मुबलक पाणी साठा झाल्याने कामगार कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.             यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जलतज्ञ  राजेंद्र सिंह, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनंत गव्हाणे,  तहसिलदार संजय वारकड, हरंगुळ(बु) जलयुक्त शिवार समितीचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.             प्रसिध्द जलतज्ञ  राजेंद्रसिंह यांच्या  प्रमुख उपस्थितीमध्ये कामगारमंत्री श्री. निलंगेकर यांनी नाल्यातील पाण्याचे विधीवत पुजन केले. हरंगुळ येथील ग्रामस्थांनी 61 लाखाचा लोकवाटा जमा करून 15 किलो मीटर नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम केले आहे. हरंगुळ शिवारात एकुण 25 किलो मीटर  खोलीकरणाचे काम करण्याचे नियोजन अज
Image
नागरिकांनी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलपुर्नभरण अभियानात सहभागी व्हावे                                                                                 -कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर        लातूर दि.15:- जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून प्रशासनामार्फत जलपुर्नभरण अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून आज पर्यंत 3 हजार नागरिकांनी या अभियानाच्या माध्यमातून  इमारतीच्या छतावर रुफ वॉटर हार्वेस्टींग करुन विंधन विहरींचे जलपुर्नभरन केलेले आहे. परंतु या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रीय सहभागी होवून टंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करावी, असे आवाहन कामगार, कौशल्य विकास, भुकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.         भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात आयोजीत मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी कामगार मंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती प्रतिभा पाटील- कव्हेकर, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार रुपा
Image
                           कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे उदघाटन           लातूर,दि.14: लातूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विवेकानंद चौक परिसरात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली.सदरील पोलीस स्टेशनचे उदघाटन कामगार कल्याण व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर  यांच्या हस्ते आज करण्यात आले.        यावेळी खासदार सुनिल गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव,जिल्हाधिकारी पांडुरंग पोले,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  चिरंजीव प्रसाद, महापौर दिपक सुळ, मुख्यकार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे,  पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड,  कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.       पोलीस स्टेशनच्या उदघाटनप्रसंगी बोलताना श्री.निलंगेकर म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता प्रस्थापित करण्यात पोलीस विभागाची महत्वाची  भुमिका आहे. तसेच देशपातळीवर महाराष्ट्र पोलीस विभागाच्या कामगिरीबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.        शहरातील वाढती लोकसंख्य
Image
सर्वसामान्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वय असावा                                                               -कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर          लातूर,दि.14: जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय व सहकार्याची भावना असावी. त्यामुळे जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल  साधवा जाऊन लातूर जिल्हयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन कामगार कल्याण व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील -निलंगेकर  यांनी केले.       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ना.संभाजी पाटील निलंगेकर बोलत हेाते .यावेळी खासदार सुनिल गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले,मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड,अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी जिल्हाधिकारी नारायण उबाळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.       श्री.निलंगेकर पुढे म्हणाले की, सर्वसमान्य जनतेच्या विकासरुपी  रथाचे   लोकप्रतिनिधी  हे एक चाक व प्रशासन दुसर
Image
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये                                                                         - खासदार सुनील गायकवाड          लातूर,दि.13: सामाजिक आर्थिक व जात सर्व्हेक्षणानुसार प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) च्या याद्या अंतीम होणार आहेत तरि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. याकरिता दिनांक 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या ठेवून लोकांना याबाबत माहिती देण्याची सूचना जिल्हा विकास समन्वय समितीच्ये अध्यक्ष तथा खासदार सुनील गायकवाड यांनी दिल्या.                 मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या पहिल्या बैठकीत खासदार गायकवाड बोलत होते. यावेळी आमदार विनायक पाटील,जिल्हाधिकारी तथा समिती सचिव पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी. पाटील,आरोग्य उपसंचालक डॉ. कुलकर्णी यांच्या सह समिती सदस्य व व