सर्वसामान्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वय असावा
                                                              -कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

         लातूर,दि.14: जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय व सहकार्याची भावना असावी. त्यामुळे जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल  साधवा जाऊन लातूर जिल्हयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन कामगार कल्याण व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील -निलंगेकर  यांनी केले.
      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ना.संभाजी पाटील निलंगेकर बोलत हेाते .यावेळी खासदार सुनिल गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले,मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड,अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी जिल्हाधिकारी नारायण उबाळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
      श्री.निलंगेकर पुढे म्हणाले की, सर्वसमान्य जनतेच्या विकासरुपी  रथाचे   लोकप्रतिनिधी  हे एक चाक व प्रशासन दुसरे चाक असून यांच्यात समन्वय राहिल्यास विकासाचा रथ वेगाने जाईल. तसेच सर्वसामान्याचे प्रश्न सोडवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही सर्वांची  जबाबदारी असल्याने सर्वांनी एकत्रित पणे काम करण्याची सुचना त्यांनी केली.
      विकासाच्या बाबतीत लातूर जिल्हा एक पथदर्शक जिल्हा होण्यासाठी सर्वांना परस्परामध्ये समन्वय व सहकार्याची भावना ठेवून  काम करण्याचे  आवाहन  श्री. निलंगेकर यांनी करून  क्रीडा व आरोग्य विभागाने अधिक  व प्रभावीपणे काम करुन शासकीय योजनांचा लाभ तळागळातील लोकापर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे असल्याचे  सांगितले. राज्यस्तरावर जलयुक्तच्या कामांमुळे लातूर जिल्हयाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.त्याप्रमाणेच जलयुक्तीची  कृषि विभागाच्या  योजनांशी सांगड घालून एक लोकचळवळ उभी करावी असे श्री.निलंगेकर यांनी सांगितले.
     प्रारंभी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पाँवर पाईंट व्दारे जिल्हयातील टंचाई परिस्थीतीवरील उपयायोजना,जलयुक्त अभियान,पर्जन्यमान पेरणी,उपलब्ध पाणीसाठा,जलपुर्नभरण  अभियान, रिक्त पदांची माहिती,दीर्घकालीन पाणी पुरवठा योजना  आदि योजना बाबत  सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. तसेच यावेळी कौशल्य विकास,कामगार कल्याण,भुकंप पुर्नवसन माजी सैनिक कल्याण या विभागांनी माहिती सादरीकरण बैठकीत केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी  ही आपल्या विभागाशी संबंधित  समस्या मांडल्या.


****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु