गणेश मंडळांनी लोकमान्य महोत्सव
व गणेशोत्सव अभियानात सहभागी व्हावे
-जिल्हाधिकारी पांडूरंग पोले
गणेश मंडळांनी 29 ऑगस्ट पर्यंत तालुका गट शिक्षणाधिकाऱ्याकडे
अर्ज करावेत
लातूर,दि.22: राज्याच्या पर्यटन व
सांस्कृतीक विभागामार्फत लोकमान्य महोत्सव व लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान-2016
या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. तरि या जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी
या अभियानात सहभागी व्हावे, तसेच दिनांक 29 ऑगस्ट 2016 पर्यंत तालुका गट शिक्षणाधिकारी
यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी
केले.
जिल्हा
नियोजन समितीच्या सभागृहात लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान-2016 च्या
आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले बोलत होते. यावेळी अभियान समिती सदस्य बसवराज
मंगरुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. गुरसळ, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, उपविभागीय
अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य.)
गणपत मोरे, याच्यासह जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशउत्सवाच्या त्या वेळच्या
उद्देशात व स्वतंत्र्यानंतर सध्या सुरु असलेल्या
गणेशउत्सव आयोजनाच्या उद्देशात फार मोठा बदल झालेला आहे. त्यामुळे शासनाने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेश उत्सव अभियान
2016 राबविण्याचे ठरविले असून त्यातून नागरिकांमध्ये
सकारात्मक ऊर्जा विकसीत होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील
गणेश मंडळांनी स्वदेशी, साक्षरता,बेटी बचाव
बेटी पढाओ, व्यसनमुक्ती व जलसंधारण या पाच विषयांवर विविध जनजागृती व माहितीपर देखाव्याचे
आयोजन करावे. तसेच वरील विषयांवर विविध उपक्रम आयोजित करावेत, अशी सुचना जिल्हाधिकारी
पोले यांनी केली.
गणेश
मंडळांनी मोठ्या प्रमाणावर या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच यावर्षीचा गणेशोत्सव
पर्यावरण पुरक होण्यासाठी सर्व मंडळांनी डीजे मुक्त गणेश प्रतिष्ठापना व विसर्जन मोहिम
राबवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी केले.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतीक विभागाच्या
वतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान 2016 हे राज्याच्या सर्व महसूल
विभागात दोन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्यस्तरीय अभियान समितीचे
सदस्य बसवराज मंगरुळे यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांची 160 वी जयंती वर्ष,गणेश उत्सवाचे
125 वे वर्ष व स्वदेशी चळवळीचे 100 वे वर्ष या निमित्त हे अभियान राबविण्यात येत असून
पहिला टप्प्यात सर्व गणेश मंडळांनी स्वदेशी, साक्षरता,व्यसनमुक्ती,बेटी बचाव बेटी पढाओ,
व जलसंधारण या पाच विषयावर उत्सव कालावधीत विविध देखावे सादर करावेत. सदरील देखाव्यांचे
निरीक्षण व मुल्यांकन तालुका गट शिक्षणाधिकारी व त्यांचे पथक करणार आहेत, अशी माहिती
श्री. मंगरुळे यांनी दिली. या अभियानात तालुका ते जिल्हा स्तर अशा गणेश मंडळांच्या
स्पर्धा वर नमूद पाच विषयावर होणार आहेत. तर दुसरा टप्प्यात चित्रकला,निबंध व वत्कृत्व
स्पर्धा वर्षभर आयोजित करण्यात यावी अशी सुचना त्यांनी केली.
तालुका जिल्हा व विभाग या तीन स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक येणा-या
गणेश मंडळांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
तालुकास्तरावरील
पुरस्कार प्रथम 25 हजार, द्वितीय 15 हजार, व तृतीय 10 हजार जिल्हास्तरावरील पुरस्कार
प्रथम 1 लाख, व्दितीय 75 हजार, व तृतीय 50 हजार तर विभाग स्तरावरील पुरस्कार,प्रथमे
2 लाख, व्दितीय दीड लाख, तृतीय 1 लाख, या प्रकारे असल्याची माहिती श्री.मगरुळे यांनी
दिली. तर जिल्हयातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी दिनांक 29 ऑगस्ट 2016 पर्यंत तालूका गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.विहित नमुन्यातील अर्ज मंडळानी केल्यानंतरच
त्यांना या अभियानात सहभागी होता येणार असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
अर्जाचा
विहीत नमुना:-
या अभियानातील स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी www.cultural.maharashtra.gov.in तसेच जिल्हा प्रशासनाचे www.latur.nic.in या संकेतस्थाळावरून विहित नमुन्यातील
अर्ज त्वरीत डाऊनलोड करून दिनांक 29 ऑगस्ट 2016 पर्यंत संबंधित तालूका गट शिक्षणाधिकारी
यांच्याकडे दयावेत.
ज्या गणेश
मंडळांनी विहित नमुन्यातील भरले जातील अर्जातील अशा मंडळानांच हया अभियानातील स्पर्धेत
सहभागी होता येणार आहे,याची नोंद घ्यावी.
या आढावा
बैठकीचे सुत्रसंचलन विवेक चौतळीकर यांनी केले
तर आभार पोलीस निरीक्षक गजाजन भातलंवडे यांनी मानले.
*****
Comments
Post a Comment