लोक अदालतीमध्ये 61 लाख 68 हजार रक्कमेची 46 प्रकरणी निकाली

         लातूर,दि.13: येथील जिल्हा सत्र न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 61 लाख 62 हजार रकमेची 46 प्रकरणे तडजोडीने निकालात काढण्यात आलेली आहेत. लातूर येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश व्ही. डी. डोंगरे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात श्री. डोंगरे यांनी लोकन्यायालयाचे महत्व विषद केले.  या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. के. चौदंते व इतर न्यायाधीश तसेच जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी ॲड. अमोल निंबुर्गे, ॲड. डी. व्ही. पाटील, ॲड. एस.व्ही. सलगरे, ॲड. डी.एस.कांबळे, बॅंक व फायनान्स कंपनीचे अधिकारी, पक्षकार आणि कर्मचारी उपस्थित होते.
               या लोकादालत मध्ये धनादेशाची प्रकरणे, बॅंक वसुलीचे, इतर वसुलीचे प्रलंबीत व वादपुर्व 2555 एवढे प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 61,68,176/- इतक्या रक्कमेची 46 इतकी प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले. या लोकन्यायालयामध्ये पॅनल प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. एल. एस. चव्हाण, तीसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्या. एम. टी. ठवरे, सहावे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्या. जी. बी. जानकर, यानी पॅनल पंच म्हणुन ॲड व्ही. जी. शंके, ॲड. मनिषा कलमे, ॲड. मधुकर कांबळे, ॲड. ज्योती तोंडरे, ॲड. एच.एल. वैद्य, ॲड. जया  कांबळे यांनी काम पाहिले.
                सदरील लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अधिक्षक आर. एस. गंडले. आर. डी. कानेगांवकर, जी. के. कंदगुळे,  के. एस. गरुडकर, आर. व्ही.  तोळे, पी. एम. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा