सर्व बॅंकांनी पीक कर्जवाटपाचे
उद्दिष्ट 31 ऑगस्ट् पर्यंत पुर्ण करावे
-जिल्हाधिकारी पांडुरंग पोले
लातूर,दि.12: जिल्हातील
सर्व बॅंकाना खरीप पीक कर्ज वाटपाचे असलेले 1 हजार 360 कोटीच्या उद्दिष्टांपैकी
748 कोटीचे पीक कर्ज शेतक-यांना वाटप केलेले आहे. तरि सर्व बॅंकानी उर्वरित पीक कर्जाचे
वाटप 31 ऑगस्ट 2016 पर्यंत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
आयोजित जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पोले बोलत होते. यावेळी
आमदार विनायक पाटील, रिझर्व्ह बॅंकेचे प्रतिनिधी मोहन सांगवीकर, जिल्हा अग्रणी बॅंक
अधिकारी अरुण महाजन, नाबार्डचे एस.बी.पाचपिंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक
श्री.रोकडे, स्टेट बॅंक हैद्राबादचे सहाय्यक महाप्रबंधक श्री.कुलकर्णी, जिल्हा नियोजन
अधिकारी एस.बी. कोलगणे, आदिसह सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पोले पुढे म्हणाले की, जिल्हातील
शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप फक्त 55 टक्के झालेले असून सर्व बॅंकानी त्यांना पीक
कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट त्वरित पुर्ण करावे. तसेच सन 2014-15 या वर्षाच्या जळकोट
व अहमदपूर तालुक्यातील काही शेतक-यांना पीक विमा मिळालेला नाही, तरि याबाबत संबंधीत
बॅंकेने विमा वाटपाची कार्यवाही त्वरित करावी,
असे श्री. पोले यांनी सांगितले. जिल्हातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मुद्रा
बॅंकेच्या कर्जाचा लाभ मिळावा म्हणून बॅंकानी याबाबत प्रसिध्दी करण्याची सुचना जिल्हाधिकारी
पोले यांनी दिली.
जिल्ह्यातील बॅंका उच्च शिक्षणाकरिता
मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक कर्ज देत नसल्याचे निर्देशनास येत आहे. तरि बॅंकांनी उच्च
शिक्षणास कर्ज पुरवठा करण्याची सुचना रिझर्व्ह बॅंकेचे प्रतिनिधी श्री. सांगवीकर यांनी
केली त्यामुळे जास्तीत जास्त विध्यार्थांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगीतले.
यावेळी जिल्हा अग्रणी
बॅंक अधिकारी श्री. महाजन यांनी बॅंकांनी शेतक-यांना केलेले पीक कर्ज वाटप, पीक कर्जाची
पुर्नरचना, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदिची माहिती दिली.
*****
Comments
Post a Comment