स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण
ना. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते
लातूर,दि.11: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट
2016 रोजी मुख्य ध्वजारोहण राज्याचे कामगार, कौशल्य विकास, भुकंप पुनर्वसन व माजी सैनिक
कल्याण मंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकूलच्या
प्रांगणात सकाळी 9 वाजून 05 मिनिटांनी होणार आहे. तरि जिल्ह्यातील सर्व नागरिक विद्यार्थी, पालक, पदाधिकारी, अधिकारी , कर्मचारी
व पत्रकारांनी या समारंभ व संचलन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत
करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय :-
भारतीय
स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हाधिकारी पांडुरंग
पोले यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण होणार आहे. तरि सर्व अधिकारी व कर्मच्या-यांनी
राष्ट्रीय पोषाख परिधान करुन नियोजीत वेळेपुर्वी 15 मिनीट अगोदर उपस्थित राहण्याची
सुचना प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
*****
Comments
Post a Comment