शेतक-यानी खरीप हंगाम पिक स्पर्धेत सहभागी
होण्याचे आवाहन
लातूर,दि.10: चालू खरिप हंगामात लातूर जिल्ह्यात
कडधान्य, गळीतधान्य,तृणधान्य व ऊस पिकासाठी पंचायत समिती पातळीवर, जिल्हा पातळीवर व
राज्य पातळीवर पिकस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सदर पिकस्पर्धेत शेतक-यांनी सहभागी
होण्यासाठी खरिप हंगाम पिकासाठी 15 ऑगस्ट 2016 ही शेवटची तारिख आहे. सदर स्पर्धेत सहभागी
होऊ ईच्छुणाया शेतक-यांनी प्रवेश फिसची रक्कम 15 ऑगस्ट 20106 पुर्वी चलनानी भरुन विहीत
नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित तालुका कृषि
अधिकारी अथवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे. तरी जास्तीत जास्त
शेतक-यांनी सदर पिकस्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मोहिम अधिकारी महेश क्षीरसागर,
कृषि विकास अधिकारी बी.एस.रणदिवे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम यांनी
प्रशिधी पत्रकान्वये केले आहे.
सदर पिकस्पर्धेत पंचायत समिती पातळीवरील स्पर्धेत
प्रथम, द्वितीय, तृतीय येणा-या शेतक-यास अनुक्रमे 2500/-, 1500/- व 1000/- रुपये, जिल्हापातळीवरील
स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणा-या शेतक-यास अनुक्रमे 5000/-, 3000/, व 2000 रुपये व राज्य पातळीवर
स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय शेतक-यास अनुक्रमे 10000/-,7000/-,5000/- रुपये बक्षीस
व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रवेश फिस सर्वसाधारण गटासाठी पंचायत समिती
पातळीसाठी 20 रुपये , जिल्हा पातळीसाठी 40 रुपये तर राज्य पातळीसाठी 60 रुपये राहील.
*****
Comments
Post a Comment