कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या
हस्ते
विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे
उदघाटन
लातूर,दि.14:
लातूर
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विवेकानंद
चौक परिसरात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली.सदरील पोलीस स्टेशनचे उदघाटन
कामगार कल्याण व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी खासदार
सुनिल गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव,जिल्हाधिकारी पांडुरंग पोले,नांदेड परिक्षेत्राचे
विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महापौर
दिपक सुळ, मुख्यकार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे यांच्यासह अन्य मान्यवर
उपस्थित होते.
पोलीस स्टेशनच्या
उदघाटनप्रसंगी बोलताना श्री.निलंगेकर म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून
शांतता प्रस्थापित करण्यात पोलीस विभागाची महत्वाची भुमिका आहे. तसेच देशपातळीवर महाराष्ट्र पोलीस विभागाच्या
कामगिरीबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील
वाढती लोकसंख्येनुसार विवेकानंद चौक परिसरात स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे आवश्यक होते.व
त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे त्यानी
सांगितले.
यावेळी
खासदार सुनिल गायकवाड व डीआयजी चिरंजीव प्रसाद यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.पोलीस अधिक्षक राठोड यांनी
पोलीस विभाग नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी
तत्पर असल्याचे प्रस्ताविकात सांगितले.
या पोलीस
स्टेशनच्या उभारणीसाठी सहकार्य केलेल्या भास्कर पाटील,अली शेख,सुमीत मोरगणे, शिंदे
मामा यांचा सत्कार कामगार मंत्री निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन गालीब शेख यांनी केले.
****
Comments
Post a Comment