कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हरंगुळ (बु.) येथे जलपुजन

लातूर दि.15:- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून हरंगुळ (बु) येथील नदीपात्राचे खेालीकरण व रूंदीकरणाचे 15 किलो मीटरचे काम करण्यात आलेले आहे. यावर्षीच्या पावसामूळे  सदरील नाल्यात मुबलक पाणी साठा झाल्याने कामगार कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.
            यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जलतज्ञ  राजेंद्र सिंह, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनंत गव्हाणे,  तहसिलदार संजय वारकड, हरंगुळ(बु) जलयुक्त शिवार समितीचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
            प्रसिध्द जलतज्ञ  राजेंद्रसिंह यांच्या  प्रमुख उपस्थितीमध्ये कामगारमंत्री श्री. निलंगेकर यांनी नाल्यातील पाण्याचे विधीवत पुजन केले. हरंगुळ येथील ग्रामस्थांनी 61 लाखाचा लोकवाटा जमा करून 15 किलो मीटर नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम केले आहे. हरंगुळ शिवारात एकुण 25 किलो मीटर  खोलीकरणाचे काम करण्याचे नियोजन अजुन याकरिता 50 लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख खासदार सुनील गायकवाड, 12 लाख आमदार अमित देशमुख, 5 लाख माजी मंत्री  दिलीपराव  देशमुख  यांनी दिलेले आहेत. अशी माहिती श्री.कदम यांनी दिली.
            लोकप्रतिनिधीनी दिलेल्या 27 लाखाच्या निधीतून 4 लाख रूपयाचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पुर्ण झाली असून उर्वरीत काम लवकरच होईल, असे श्री.कदम यानी सांगितले.
शिवारात  सर्वत्र पाणी
हरंगुळ बु गाव शिवारात  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून झालेल्या कामामुळे शिवारातील सर्व विहिरी व विंधन विहरींना मुबलक पाणी आलेले आहे.त्यामुळे गावाचा प्रश्न सोडविला  जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांना पुरक सिंचनाचा लाभ मिळणार आहे.नदी पात्राच्या परिसरातील शेतकरी सुधीर पाटील यांच्या शेतातील 80 फुट खोल असलेली विहिर पाण्याने काटोकाट भरलेली आहे. व शिवार परिसरात सर्वत्र असेच चित्र असल्याची माहिती ग्रामस्थ  सांगत होते.
            यावेळी शेतकरी सुधीर पाटील यांच्या विहीरीची पाहणी जलतज्ञ  राजेंद्रसिंह व जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केली.
****




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु