सर्व नागरिकांनी महा-अवयव दान अभियानात सहभागी व्हावे
                                जिल्हाधिकारी पांडुरंग पोले
      लातूर,दि.30: राज्य शासन दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत राज्यात सर्वत्र महा-अवयवदान अभियान राबवित आहे. सर्व नागरिकांमध्ये अवयव दानाविषयी जनजागृती करुन इतर गरजू लोकांना  आपल्या अवयव दानामूळे नवजीवन मिळू  शकते याची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे तरी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महाअवयव दान अभियानात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे.
         यावेळी खासदार सुनील गायकवाड ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए.डी. शिंदे, उप अधिष्ठाता  डॉ. गिरीष ठाकूर, डॉ. मंगला शिंदे, प्राध्यापक डॉ. एस.जी. देशपांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक कोकणे जिल्हा शल्य चिकीत्सक  श्री. डॉ. दुधाळ तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थींनी, अधिकारी कर्मचारी, परिचर्या, एम. आय. टी कॉलेजमधील विद्यार्थी तसेच प्राध्यापक वृदांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
          जिल्हाधिकारी पोले म्हणाले की, मानवी जिवनात अवयव दानाला अत्यंत महत्व असून ही एक निरंतर चलणारी प्रक्रिया झाली पाहीजे. त्याकरीता सर्व नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प करुन इतर गरजू लोकांना अवयवदान केल्यास अशा लोकांचे जीवन सुकर होणार असल्याने या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन इतरांना ही सहभागी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
          खासदार सुनील गायकवाड म्हणाले की, मानवी जीवनाला अवयव दानामुळे नवसंजीवनी प्राप्त होत आहे. परंतु सर्व सामान्य नागरीकामध्ये अवयव दानांबद्दल अनेक गैरसमज आहेत. तरी या महाअवयवदान रॅलीच्या माध्यमातून नागरिकांचे गैरसमज दूर व्हावेत असे त्यांनी सांगीतले. तसेच या अवयव दान रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी इतर नागरिकांचे प्रबोधन करुन अवयव दान करण्याबाबत त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. असे श्री. गायकवाड यांनी स्पष्ठ केले. यावेळी माजी खासदार गोपाळराव पाटील यांनी ही अवयवदान बाबत मार्गदर्शन केले.
        प्रारंभी वैद्यकीय महाविद्यालय येथे महा अवयव दान जनजागृती रॅलीस सकाळी ठीक 9.00 वाजता खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, महापौर दिपक सूळ यांनी हिरवी झेंडी दाखवून  शुभारंभ केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये अवयवदानावर पथनाट्य सादर केले. ही रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून गांधी चौक, शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रिडा संकूल येथे आली व अवयवदाना विषयी घोषवाक्य देवून रॅलीची सांगता झाली.
          
*****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु