प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये
                                                                        - खासदार सुनील गायकवाड


         लातूर,दि.13: सामाजिक आर्थिक व जात सर्व्हेक्षणानुसार प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) च्या याद्या अंतीम होणार आहेत तरि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. याकरिता दिनांक 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या ठेवून लोकांना याबाबत माहिती देण्याची सूचना जिल्हा विकास समन्वय समितीच्ये अध्यक्ष तथा खासदार सुनील गायकवाड यांनी दिल्या.
                मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या पहिल्या बैठकीत खासदार गायकवाड बोलत होते. यावेळी आमदार विनायक पाटील,जिल्हाधिकारी तथा समिती सचिव पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी. पाटील,आरोग्य उपसंचालक डॉ. कुलकर्णी यांच्या सह समिती सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.
               खासदार गायकवाड पुढे म्हणाले की, यापुर्वीच्या दारिद्र्य  रेषेखालील याद्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या महत्वाच्या आहेत. अधिकारी व कर्मचा-यांनी ग्रामस्थांना याबाबत योग्य ती माहिती द्यावी असे त्यांनी सांगीतले. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले ,आमदार विनायक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदाळे यांनी ही मार्गदर्शन केले.
                खासदार सुनिल गायकवाड यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,समाज कल्याणच्या योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, कौशल्य विकास, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, पंतप्रधान जन सुरक्षा योजना, मुद्रा बॅंक योजना आदि योजनांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन सुचना दिल्या.


*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु