महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य
                                          लोकांसाठी काम करावे
                              --- अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर
लातूर, दि.01: महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजातील सर्वसामान्य्‍ ,वंचित व दुर्लक्षित राहिलेल्या लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर यांनी केले.
महसूल दिनानिमित्त स्व.दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री.पाटोदकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग,निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे,उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनंत गव्हाणे,जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव,उपजिल्हाधिकारी श्री. फड,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, विकास खरात, प्रवीण फुलारी, भवानजी आगे, सर्व तहसिलदार,नायब तहसिलदार, व इतर महसूल अधिकारी कर्मचारी त्यांचे व  पाल्य मोठया संख्येने उपस्थित होते.
            श्री पाटोदकर म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व महापुरूषाचे चरित्र पाहिले असता लक्षात येते की,या सर्व महापुरुषांनी  सर्वसामान्य लोकांसाठी  कार्य केलेले आहे.त्याप्रमाणेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजातील  सर्वसामान्य लोकांसाठी काम करुन त्यांच्यापर्यंत सर्व शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच सर्वांनी आजच्या महसूल दिनानिमित्त्‍ सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा संकल्प  करावा,असे श्री.पाटोदकर यांनी सांगितले.
            महसूल विभाग हा ग्रामीण भागाशी विशेषत: शेती, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी नाळ ठेवणारा विभाग असल्याचे महापालिका आयुक्त श्री.सुधाकर तेलंग यांनी सांगितले ,तसेच तलाठी व तहसिलदार महसूल विभागाचा कणा असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.टंचाईच्या काळात शासकीय सुटीदिवशी ही सातत्यपुर्ण काम करून टंचाईवरील उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.त्याप्रमाणेच अशा परिस्थीतीमध्ये ही वसूलीचे उदिष्ट 100 टक्के पुर्ण केल्याबद्यल सर्वाचे अभिनंदन निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांनी केले.टंचाईच्या उपाय योजना राबविताना इतर विभागाचे चांगले सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्यांची कामे नियमित व वेळेवर पुर्ण करावीत व महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जिल्हयाच्या तळागळापर्यंत पोहचविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री.गव्हाणे यांनी केले.यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,तहसिलदार  विक्रम  देशमुख ,नायब तहसिलदार जीवन कुलकर्णी, महसूल कर्मचारी संघटनेचे रत्नाकर महामुनी तलाठी कर्मचारी संघटनेचे बी. व्ही. बेरुळे आदिंनी  ही आपले मनोगत व्यक्त केले.
दिनांक 1 ऑगस्टच्या दिनानिमित्त्‍ सर्व मान्यवरांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन अधिका चांगली  कामगिरी करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर ,आयुक्त सुधाकर तेलंग व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व  दीप प्रज्वलन करून महसूल दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी (24) ,गुणवंत विद्यार्थी (18) उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी (38) तसेच पदोन्न्ती मिळालेलें (29) या सर्वाचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
     प्रारंभी लातूर येथील बंकटलाल इंग्लीश स्कुलच्या विद्यार्थ्यींनी स्वागत गीत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.तसेच याप्रसंगी व्ही आर कुलकर्णी डॉ.बनशेळकीकर यांचा गीत गायनाचा कार्यक्रम ही झाला.
कार्यक्रमाचे प्रास्तावीकात उपविभागीय अधिकारी प्रताप काळे ते म्हणाले की,महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दव फड,सुशील सुर्यवंशी व पुजा गोरे यांनी केले.तर आभार तहसिलदार संजय वारकड यांनी मानले.

महिला सक्षमीकरण सप्ताहाचे उदघाटन


                जिल्हयाच्या तळागळापर्यंत असलेल्या सर्वसामान्य महिलांपर्यंत शासकीय योजना पोहोचवून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महिला  सक्षमीकरण सप्ताहाचे उदघाटन अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते महसूल दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सात महिलांना मान्यवरांच्या हस्ते 7/12 व 8-अ आदि प्रमाणपत्रे देण्यात आली.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु