महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांनी राबवावा -जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान उपक्रम
जिल्ह्यातील सर्व शाळांनी राबवावा
-जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे
लातूर दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान उपक्रमाचे कौतुक करून भविष्यामध्ये सगळ्याच तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांना आशा प्रकारे आदर्श शाळा उपक्रमात आणता येईल,अशा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी भावना व्यक्त केली.
श्रीमती भारतबाई सोळंके यांनी जिल्हा परिषद शाळा व त्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व विशद केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आज दि. 3 जानेवारी, 2022 रोजी ग्राम विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्यावतीने ज्ञानोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद लातूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ज्ञानोत्सव-2022 पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुलजी
केंद्रे व स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य
समिती सभापती श्रीमती भारतबाई सोळंके यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी उपस्थित मान्यवरांचे
वृक्षांची रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (MVSTF) चे जिल्हा समन्वयक
विनायक तौर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगून अभियानाबद्दल माहिती दिली. यावेळी
सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये नटून आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी
आपल्या उत्कृष्ट भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या दैदिप्यमान, संघर्षमय जीवनपटलावर
प्रकाश टाकला .
यावेळी उपस्थित तिनही आदर्श शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी मित्र,
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सरपंच उपसरपंच यांना ज्ञानोत्सव-2022 अंतर्गत
आराखड्यामध्ये समाविष्ट काही ठराविक साहित्याचे वाटप केले गेले. त्यात प्रामुख्याने
लॅपटॉप, संगणक संच, एलईडी टीव्ही संच इत्यादी वस्तू होत्या.
सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी
(पं) तथा नोडल अधिकारी (VSTF) मा.श्री दत्तात्रय गिरी सर तसेच, मा.भगवान फुलारी सर
शि.अ(प्राथमिक), मा.श्री विजय वलांडे सर (कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा अभियान),गट
शिक्षण अधिकारी अनिल पागे सर, VSTF जिल्हा कार्यकारी विनायक तौर ,तालुका समन्वयक (सर्व),
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी शालेय व्यवस्थापन समिती
अध्यक्ष, सदस्य ,सरपंच, उपसरपंच इत्यादींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचलन समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक
विवेक सौताडे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन
शिक्षणाधिकारी भगवान फुलारी सर यांनी केले.
0000
Comments
Post a Comment