विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज अर्ज 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन सादर करावेत

 

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज

 अर्ज 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन सादर करावेत

लातूर,दि.20(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास दिनांक 31 जानेवारी, 2022 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी  आवाहन केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांना  सन 2020-21 साठी Re-apply करण्यासाठी व सन 2021-22 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI) व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल  दि. 14 डिसेंबर, 2021 सुरु करण्यात आलेले आहे.

 ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नीत युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी नवीन नॉन आधर युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास एका पेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी महाविद्यालयांची राहील असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत