उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास 59.18 कोटीचा निधी मंजूर -राज्यमंत्री संजय बनसोडे

 

उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या

प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास 59.18 कोटीचा निधी मंजूर

                                     -राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर,दि.22(जिमाका):-उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामास 59.18 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे  यांनी  दिली आहे. उदगीर येथील दुग्ध्‍ तंत्रज्ञान महाविद्यालय हे मराठवाडयातील एकमेव आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक चा आहे, या निधीमुळे नाविण्यपूर्ण गोष्टी करता येणार असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर अंतर्गत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर येथे शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून सुरू करण्यात आले. कृषि व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी स्वतंत्र मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत सदर महाविद्यालय, पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले सन 2008 पासून आज रोजी पर्यंत पशुवैद्यक महाविद्यालय परिसरातील इमारतीत सुरु आहेत. महाविद्यालयाचे शिक्षण, विस्तार व संशोधन चे उद्दिष्ट पूर्तता करताना अपुरे व तात्पुरत्या मोठ्या प्रमाणात अडचणींना सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये ही मोठी अडचण ठरत होती. आता या निधीमुळे विकासाला चालना मिळेल, विद्यार्थ्यांचा यामुळे मोठा फायदा होणार असल्याचेही राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.

 मराठवाड्यातील हे एकमेव महाविद्यालय असल्याने शेतकरी, दुग्ध व्यवसायीक यांच्या प्रशिक्षणा करिता व दुग्ध तंत्रज्ञान संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाचे महत्त्व व योगदानाची बाब आपल्या लक्षात आली व गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी रू. 59.18 कोटी मंजूर करण्यास्तव शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून या कामाच्या मान्यतेसाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, पालकमंत्री अमित देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम येणाऱ्या आर्थिक वर्षात सुरुवात होत असल्याने दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, सर्व अधिकारी/ कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपरोक्त निधी तथा प्रशासकीय मंजुरीकरिता महाविद्यालय प्रशासनातर्फे संजय बनसोडे यांचे आभार मानले आहे.

 

                                                    0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत