आला उन्हाळा तब्येत सांभाळण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

 

आला उन्हाळा तब्येत सांभाळण्याचे

जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

 

लातूर,(जिमाका) दि.21:- वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. मार्च महिन्यापासूनच आपण राज्यातील अनेक भागात तापमान वाढताना पाहत आहोत.सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान तीन डिग्री सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखादया भागात तापमान सलग दोन दिवसासाठी 45 डिग्री सेंल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. सर्व साधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, व जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्यूही हेाणे संभवनीय असल्याने प्रत्येकाने आपली तबीयत सांभाळण्याचे आवाहन जि.प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वगगावे यांनी केले आहे.

उष्माघातासाठी अति जोखमीचे घटक पूढील प्रमाणे आहेत.- उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्दलोक व लहान मुले, गरोदर महिला, स्थूललोक, पुरेशी झोप न झालेली लोक, मधुमेह, हृदयविकार, दारुचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रीत, घरदार नसलेले गरीब लोक, कारखाण्यात बॉयलर जवळ काम करणारे लोक.अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संबंध येणाऱ्यांना उष्माघात होतो. वरील अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहीजे. उष्णतेमुळै होणारा शारिरीक त्रास किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा असतो.

लक्षणे :- थकवा येणे, ताप येणे, शरिरावर रॅश उमटने, हातापायांना गोळे येणे, चक्कर येणे, त्वच्या कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसीक बैचेनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था व मृत्यूही येऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय :- पुरेसे पाणी प्या,प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे , फिक्ट रंगाचे (पांढरे) सैलसर कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री, टोपी व पादत्राणे वापरा, ओलसर पडदे (वाळयाचे), पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा, उन्हात जाण्यापुर्वी सनस्क्रिन क्रिम वापरा किंवा कोरफडीचा गर लावा. शरबत किंवा जलसंजीवनीचा वापर करा.

हे करु नका :- कष्टाची कामे उन्हात करु नका, शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा, लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नका, गडद रंगाची तंग कपडे वापरु नका, मद्यपान, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक टाळा, खुप प्रथीनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.

उपचार :- रुग्णास वातानुकीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीचे प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात. आईसपॅक लावावेत. रुग्णाला नजीकच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे.

 

                                      0000

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित