राज्यमंत्री सहकार, कृषी सामाजिक अन्न व नागरी पुरवठा डॉ.विश्वजीत कदम यांचा लातूर जिल्हा दौरा

 

राज्यमंत्री सहकार, कृषी सामाजिक अन्न व नागरी पुरवठा

डॉ.विश्वजीत कदम यांचा लातूर जिल्हा दौरा

 

        *लातूर,दि.26(जिमाका):-* राज्यमंत्री सहकार,कृषी सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा डॉ. विश्वजीत कदम हे दिनांक 27 मार्च, 2022 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

          रविवार दिनांक 27 मार्च 2022 रोजी सकाळी 10.15 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन, सकाळी 10.30 वाजता रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.15 वाजता औसा रोड लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन वस्तीगृह परिसर, येथे अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहाच्या लोकर्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. बांधकाम भवन, औसा रोड, लातूर येथे लातूर मंडळ कार्यालयाच्या उद्घाटन समारंभ व विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी बांधकाम भवन, औसा रोड, लातूर येथून वाहनाने लातूर विमानतळकडे प्रयाण.

                                                                              0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत