पशुधन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन अर्ज करावेत

 

पशुधन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत

लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन अर्ज करावेत

 

        लातूर दि.2(जिमाका) पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजनेंतर्गत गाय / म्हैस गट वाटप, शेळी- मेंढी गट वाटप व 1000 मांसल कुक्कुट पक्षी निवार उभारणीसाठी अनुदान व जिल्हास्तरीय जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यासाठी दि. 4 डिसेंबर 2021 पासून  प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन,) जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

        जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ही त्यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                              000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत