जिल्ह्यात आज रमजान ईदनिमित्त मद्य विक्री बंद

 

जिल्ह्यात आज

रमजान ईदनिमित्त मद्य विक्री बंद

*लातूर, दि.2(जिमाका):-* जिल्ह्यात दिनांक 3 मे 2022 रोजी रमजान ईद उत्सव मोठया प्रमाणात साजरा होत असल्याने या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दि. 3 मे 2022 रोजी (एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार) रमजान ईद उत्सव निमित्त सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती मद्यविक्रीस संपूर्णत: बंद राहतील असे आदेश जारी केले आहेत.

या आदेशाची लातूर जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषांगिक नियमांधारे कडक कारवाई करण्यात येईल याची नांद घ्यावी. असे ही आदेशात नमुद केले आहे.

 

                                                     000

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित