पोलीस स्टेशन चाकूर येथील 26 बेवारस मोटार सायकलचा जाहीर लिलाव

 

पोलीस स्टेशन चाकूर येथील 26 बेवारस

मोटार सायकलचा जाहीर लिलाव

              *लातूर,दि.5 (जिमाका):- *चाकूर येथील तालुका दंडाधिकारी यांनी 26 बेवारस मोटार सायकल स्क्रॅप करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या बेवारस मोटार सायकलचा जाहीर लिलाव करुन जास्तीत- जास्त किंमत यावी या उद्देशाने लिलाव करावयाचा आहे.

               दि. 10 मे 2022 रोजी पोलीस स्टेशन चाकूर येथे जाहीर लिलाव करण्यात येणार असून ज्यांना जाहीर लिलावामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रमांक 02382-252040 मो.नं. 9823478468 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक पो.स्टे. चाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                          000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत