पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आजपासून आयोजन 18 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आजपासून आयोजन

18 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

*लातूर, दि. 15 (जिमाका):* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्त 16 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन मेळाव्यासाठी लातूर जिल्ह्यातील आस्थापना आणि उद्योजकांनी एकूण 94 पदे अधिसूचित केली आहे. यामध्ये लातूर येथील जय इंडस्ट्रीने 30 पदे अधिसूचित केली असून यासाठी दहावी किंवा आयटीआय (वेल्डर, फिटर, टर्नर) पात्रता राहील. लाईफ इन्सुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडियामार्फत 50 पदे अधिसूचित करण्यात आली असून त्यासाठी इयत्ता दहावी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. गर्जे ऑटोमोटिव्ह सर्व्हीसेसने 14 पदे अधिसूचित केली असून त्यासाठी दहावी/ बारावी/ पदवी / पदव्युत्तर पदवी / एमबीए / पदविका / आयटीआय (ऑटोमोबाईल) ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी अधिसूचित केलेली सर्व रिक्तपदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 16 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पसंती क्रमांकांनुसार अर्ज करावा. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रामध्ये किंवा 02382-299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मोरे यांनी केले आहे.

*****   

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित