पालकमंत्री गिरीश महाजन लातूर जिल्हा दौऱ्यावर

 पालकमंत्री गिरीश महाजन लातूर जिल्हा दौऱ्यावर

लातूर, दि. 02 (जिमाका) :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज,

वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी ( दि. 3) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील विविध बैठका, कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री श्री. महाजन यांचे 3 नोव्हेंबर रोजी सकाळी सातला लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सकाळी साडेआठ वाजता ते आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या एलआयसी कॉलनी येथील निवासस्थानी, तसेच सकाळी नऊ वाजता आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा येथी निवासस्थानी सदिच्छा भेट देतील.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता पालकमंत्री श्री. महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. दुपारी एक वाजता ते खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाखर सांगवी रोडवरील निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी दीड वाजता आमदार रमेश कराड यांच्या प्रयाग निवास येथे राखीव. दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. दुपारी साडेचार वाजता पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांची भेट घेवून सायंकाळी पाच वाजता शासकीय वाहनाने अहमदपूरकडे प्रयाण करतील. अहमदपूर येथे सायंकाळी साडेपाच वाजता गणेश हाके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी सहा वाजता नांदेडकडे प्रयाण करतील.
 **

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित