विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा रविवारी लातूर दौरा

 

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा रविवारी लातूर दौरा

लातूर, दि. 26 (जिमाका) :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे रविवारी (दि. 27) एक दिवसाच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनला लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. दुपारी चार वाजता सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला भार्गव यांच्या सामाजिक कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी बैठक होईल. सायंकाळी सव्वासात ते रात्री आठ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. रात्री आठ वाजता त्या सोलापूरकडे प्रयाण करतील.

*****

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत