चौकीदार, सफाई कामगार, माळी पदांसाठी 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

                                                      चौकीदार, सफाई कामगार, माळी पदांसाठी

7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर दि.4(जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील सैनिक मुलांचे व मुलींचे वसतिगृह व विश्रामगृह येथे विविध अशासकीय रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याकरिता माजी सैनिक, आजी सैनिक पत्नी, विधवा तसेच इतर नागरिकांनी 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

चौकीदाराच्या तीन पदांसाठी भरती होणार असून यामध्ये दोन पुरुष व एक महिला चौकीदाराची प्रतिमाह 8 हजार 911 रुपये मानधनावर नियुक्ती करण्यात येईल. सफाई कामगारांच्या दोन पदांवर एक महिला व एक पुरुषाची प्रतिमाह 5 हजार 658 रुपये मानधनावर नियुक्ती होईल. माळी पदावर एका व्यक्तीची प्रतिमाह 4 हजार मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत