उदगीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर होणार शिल्प निदेशाकाची नेमणूक

 

उदगीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

तासिका तत्वावर होणार शिल्प निदेशाकाची नेमणूक

·       15 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 01 (जिमाका): उदगीर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले अर्ज स्वतः उदगीर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे

जोडारी (फिटर) तुकडी संख्या 2, मोटार मेकॅनिक (एमएमव्ही) तुकडी संख्या 2 आणि संधाता (वेल्डर) तुकडी संख्या 1 याकरिता निदेशाकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी अभियांत्रिकी पदवी, एक वर्ष अनुभव किंवा अभियांत्रिकी पदविका आणि दोन वर्षे अनुभव आवश्यक आहे. आयटीआय आणि सीआयटीएसमधील दोन वर्षाचा अथवा आयटीआय आणि अप्रेंटशिपचा तीन वर्षाचा अनुभव या पदांसाठी आवश्यक आहे.

संबंधित व्यवसायाच्या शिक्षकीय पदाची पात्रता संबंधित व्यावसायाच्या शाखेप्रमाणे राहील. तसेच संबंधित क्षेत्रातील पदांच्या अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. या पदांसाठी 15 नोव्हेंबर, 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार तासिका मानधन देण्यात येईल. 15 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे उदगीर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत