छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे 24 जून रोजी लातूर येथे आयोजन

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे

24 जून रोजी लातूर येथे आयोजन

· पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

लातूरदि. 21 (जिमाका) : येथील औसा रोडवरील वाडा हॉटेलजवळील कस्तुराई मंगल कार्यालय येथे 24 जून 2024 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

क्रीडा व युवक कल्याणबंदरे मंत्री संजय बनसोडेजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह विविध कार्यालयाचे विभाग प्रमुखप्राचार्यशिक्षणतज्ज्ञ या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत.

शिबिरामध्ये इयत्ता दहावीबारावीनंतर काय भविष्यातील रोजगाराच्या संधीव्यक्तीमत्व विकासबायोडाटा तयार करणे व मुलाखतीची तयारीनवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याविषयीतसेच शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँकाविविध महामंडळे शासकीय योजनांची माहितीकलमापन चाचणीशैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना याबाबत माहिती व करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून मार्गदर्शन होणार आहे.

लातूर येथे होत असलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरास सर्व युवक-युवती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यंनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी कु. एम. आर. बोरुळकर यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित